Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

कुपवाड मध्ये सार्वजनिक वाचनालयात महिला दिन साजरा

कुपवाड (प्रमोद अथणिकर)
कुपवाड येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने 8 मार्च महिला दिन व 10 मार्च सावित्रीबाई फुले स्मृतिदिन असा संयुक्त कार्यक्रम सार्वजनिक वाचनालयात संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आर पी पाटील विद्यालयातील प्रा. निलम पाटील मॅडम उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमास जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळा नं 2 मधील सौ अस्मिता अमोल भोकरे, सौ वर्षाराणी संभाजी माने उपस्थित होत्या. त्याचबरोबर जिल्हापरिषद मराठी मुलींची शाळा न 2 मधील इयत्ता 7 वी च्या मुली उपस्थित होत्या. यावेळी प्रा निलम पाटील म्हणाल्या की 8 मार्च महिला दिन आणि 10 मार्च हा सावित्रीबाई फुले स्मृतिदिना निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. 8 मार्च 1908 रोजी क्लारा झेटकीन या महिलेने युरोप मध्ये महिला वर होणाऱ्या अन्याय अत्याचारा विरुध्द त्यांनी बंड पुकारला होता व त्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. असे दोन वेळा महिला परिषद भरली होती आणि यातूनच महिलांना मतदानाचा हक्क मिळाला. म्हणून तो दिवस महिला दिन म्हणून साजरा केला जातो, असे मत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक कवी आलताब हुसेन मुजावर यांनी केले तर आभार अस्मिता भोकरे मॅडम यांनी मांडले

Post a comment

0 Comments