Daily Mahasatta

Daily Mahasatta

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ

पेठ (रियाज मुल्ला)
नेर्ले ता. वाळवा येथे सौ. संगीता संभाजीराव पाटील जिल्हा परिषद सदस्या यांच्या विशेष प्रयत्नाने शाळा नं. 1 चे माॅडेल स्कुल अंतर्गत 3 वर्ग बांधणे, क्रीडांगण करणे, कंपाऊट वाॅल बांधणे रू. 40 लाख, व अंगणवाडी इमारत रू. 8.50 लाख या कामांचा शुभारंभ सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मा. देवराज पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी माजी सरपंच संभाजी पाटील, राजारामबापू पाटील बँकेचे संचालक संजय पाटील , वाळवा तालुका युवक राष्ट्रवादीचे सदस्य शुभम पाटील, नेर्ले गावचे सरपंच छाया रोकडे, उपसरपंच विश्वास पाटील ,नेर्ले ग्रामपंचायतचे सदस्य निवास माने , माणिक पाटील, सुयोग पाटील , सदस्या अर्चना पाटील, शोभा पाटील, मनीषा जंगम , नेर्ले गावचे ज्येष्ठ नेते सदाशिव पाटील, सुरेश पाटील , दत्तात्रय पाटील, दिनकर मोकाशी , जालिंदर पाटील, हणमंत माने , महेश पाटील , इंजिनिअर चेतन रणखांबे , अवधूत कुलकर्णी, विजय लोहार,विठ्ठल दळवी व ग्रामस्थ, शिक्षक, पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments