Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

नव कृष्णा व्हॅली मेडिकल अँड आयआयटी अकॅडमी चे उद्घाटन

कुपवाड (प्रमोद अथणिकर)
सुरज फाऊंडेशन संचलित नव कृष्णा व्हॅली स्कूल यांच्यामार्फत मेडिकल अँड आय आय टी अकॅडमी या नवीन अकॅडमी चे उद्घाटन झाले. स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य सौ संगीता पागनीस यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर विनोद परमशेट्टी यांच्याहस्ते या नव कृष्णा व्हॅली मेडिकल अँड आयटी अकॅडमी चे दीप प्रज्वलन करून उद्घाटन झाले .

यावेळी संस्थेचे ट्रस्टी चेअरमन माननीय प्रवीण लुंकड , सचिव एन जी कामत ,प्राचार्या सौ संगीता पागनीस, डॉक्टर सातपुते, डॉक्टर मुळे त्याचबरोबर नेव्ही कमांडर किसन खिलारे, प्राचार्य अवताडे सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते. डॉक्टर विनोद परमशेट्टी यांचा सत्कार माननीय प्रवीणजी लुंकड सुरज फाउंडेशन अध्यक्ष यांच्या हस्ते झाला. डॉक्टर सातपुते यांनी अकॅडमी तील सर्व विषयातील तज्ञ शिक्षक व उच्च दर्जाचे शिक्षण देण्याची हमी दिली तसेच या अकॅडमी कडे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रेरित होऊन आपले भविष्य घडवावे असे मत त्यांनी व्यक्त केले.

त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर विनोद परमशेट्टी यांनी आपल्या मनोगतामध्ये सर्व मुलांनी अभ्यासाबरोबर योग्य ती मेडिकल अँड आयटी सारख्या कोर्सची निवड करून उत्तुंग झेप घ्यावी हा संदेश दिला. तसेच सध्याच्या काळाची गरज ओळखून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी मेडिकल आयआयटी जी ई ई या कोर्स कडे वळावे असे त्यांनी सांगितले.

मुळे सर यांनी अकॅडमी विषयी सर्व ती माहिती सविस्तर सांगितले. त्यामध्ये प्रामुख्याने फाउंडेशन कोर्स हा आठवी ते दहावी साठी अकरावी व बारावी साठी आयटी व जी ई ई हा कोर्स आहे व त्याचे महत्त्व थोडक्यात त्यांनी सांगितले . यानंतर सुरज फाऊंडेशनचे ट्रस्टी चेअरमन प्रवीण लुंकड यांनी हि अकॅडमी काळाची गरज ओळखून सुरू केली. कारण सध्याच्या काळात चांगले डॉक्टर ,चांगले इंजिनियर घडविणे गरजेचे आहे त्यासाठी चांगले अकॅडमी चांगले शिक्षक उच्च दर्जाचे शिक्षणासाठी ही अकॅडमी सुरू केले आहे. तसेच भविष्यात इथले विद्यार्थी उज्ज्वल भविष्य घडवतील व आमच्या स्कूल मधील स्मृती मानधना, राधिका आवटी सारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार झाले आहेत. तसेच मेडिकल व आयआयटी अकॅडमी चांगले विद्यार्थी घडावेत असे मत व्यक्त केलें. संस्थेचे सचिव माननीय एन जी कामत सर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments