Daily Mahasatta

Daily Mahasatta

' करेक्ट ' वजनमुळे शेतकऱ्यांचा विराज कारखान्यावर विश्वास : अॅड पाटील

विटा (प्रतिनिधी)
विराज केन्स अँड एनर्जी लिमिटेड या कारखान्याचा सण 2020/21हा गळीत हंगाम यशस्वीरीत्या पूर्ण झाला. या सांगता समारंभाच्या निमित्ताने कारखान्यांमध्ये पूजेचे व पोती पूजनचे आयोजन केले होते.

यावेळी बोलताना संस्थापक चेअरमन सदाशिवराव पाटील म्हणाले, वेळेत रक्कम व करेक्ट वजन दिल्यानेच सभासद व शेतकरी यांनी विराज कारखान्यावर विश्वास दाखवला म्हणून सलग 212 दिवस कारखाना चालवण्यामध्ये आपण यशस्वी ठरलो. कारखान्याचा सर्व स्टाफ व कॉन्ट्रॅक्टर यांनी शर्तीचे प्रयत्न केले. शेती विभागाने अगदी पाऊस चालू असताना सुद्धा विशेष प्रयत्न केले. त्यांचेही अभिनंदन करतो. असे नियोजन प्रत्येक हंगामात ठेवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो.

यानंतर बोलताना कार्यकारी संचालक संग्राम देशमुख म्हणाले,चालू हंगामात 500 मेट्रिक टन क्षमता असताना जनरल मॅनेजर विजय कुलकर्णी यांनी क्षमतेपेक्षा जादा म्हणजे साडेसहाशे मेट्रिक टन प्रतिदिन गाळप करून चालू सिझनला एक लाख 21 हजार मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट त्यांनी पूर्ण केले आहे. महाराष्ट्र मध्ये सर्वात प्रथम कारखाना सुरू करण्याचे धाडस वैभव दादा यांनी केले. त्यांना सर्व संचालक व कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिल्यानेच हंगाम यशस्वीरीत्या पूर्ण झाला. भविष्यात विराज कारखाना हा शेतकऱ्यांचा ऊस उत्पादन वाढीसाठी व सर्वात जास्त दर देण्याचा प्रयत्न करेल आणि वजन काटाही पारदर्शक असेल. दहा दिवसात बिल दिल्याने शेतकरी वर्गामध्ये समाधान व्यक्त होत आहे, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
यावेळी शेती अधिकारी रमेश शिंदे यांचा सत्कार करण्यात आला

यावेळी कार्यकारी संचालक संग्राम देशमुख, उत्तम पाटणकर, गोविंदराव भोसले, राजेंद्र माने, अमित भोसले, चिप केमिस्ट दीपक पाटील, दीपक जांभळे, सर्व तोडणी वाहतूक कंत्राटदार, अधिकारी स्टाफ व गव्हाण मुकदम कॉन्ट्रॅक्टर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments