Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

सांगली महापालिकेकडून महिला दिनी ऑनलाईन योग शिबिराचे आयोजन

: सभापती ढोपे पाटील यांची माहिती
सांगली (प्रतिनिधी)
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेकडून महिला दिनानिमित्त योग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान केला जाणार आहे अशी माहिती महिला बालकल्याण सभापती सौ. गीतांजली ढोपे पाटील यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून प्रातिनिधिक स्वरूपात महिला दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये 8 मार्च 2021 रोजी दुपारी 1 वाजता बालगंधर्व नाट्यगृह मिरज येथे महापौर दिग्विजय सूर्यवंशी, उपमहापौर उमेश पाटील, आयुक्त नितीन कापडणीस, स्थायी सभापती पांडुरंग कोरे, उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील यांच्यासह नगरसेवकांच्या उपस्थितीत महिलांचा सत्कार तसेच जीवन गौरव पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे. याच अनुषंगाने महिलांचे आरोग्य सुस्थित राहावं आणि योगाकडे सर्वानी वळावे या उद्देशाने योग सप्ताह सुद्धा घेणेत येत आहे.

8 मार्च ते 14 मार्च या कालावधीत दररोज सकाळी 8:30 ते 9:30 यावेळते ऑनलाईन योग शिबिर घेतले जाणार असून योग शिक्षक हर्षद गाडगीळ हे ऑनलाईन योग शिबिर घेणार आहेत. या ऑनलाईन योग शिबिरात सर्वाना सहभागी होता यावे यासाठी झूम ऍपद्वारे हे शिबिर घेतले जाणार आहे. याचा आयडी महापालिकेच्या फेसबुक पेजवर उपलब्ध केली जाणार आहे. या ऑनलाईन योग शिबिरात जास्तीजास्त लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहनही सभापती गीतांजली ढोपे पाटील यांनी केले आहे.

Post a comment

0 Comments