Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

आंधळी येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एटीएम व्हॅनचे उद्घाटन

पलुस (अमर मुल्ला)
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने आंधळी येथे मोबाईल ए टी एम व्हॅनचे उद्घाटन बँकेचे संचालक महेंद्र आप्पा लाड यांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी महेंद्र आप्पा म्हणाले, लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी मोबाईल एटीएम व्हॅन सेवा आंधळी गावामध्ये आज सुरू केली आहे. लोकांना सुविधा व कर्ज पुरवठा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचे धोरण बँकेच्या माध्यमातून केले जाते. कमी कागदपत्रांमध्ये कर्ज उपलब्ध करून देण्याची सुविधा या बँकेमध्ये केली जाते. जसे लोकांचे व्यवहार असतील तसं कर्ज पुरवठा बँकेकडून केला जातो. इतर बँकांच्या बरोबरीत सुविधा उपलब्ध आहेत. कमी कागदपत्रात व कमी वेळेत कर्ज पुरवठा केला जातो. काही अशा योजना आहेत की वेळेत कर्ज घेतले आणि वेळेत परतफेड केली की 0% व्याजदर आकारले जाते.

तरी ग्राहकांनी बँकेमध्ये आपले क्रेडिट तयार केले पाहिजे. बँक आपणाला लाखो रुपये कर्ज पुरवठा करून देते. लोकांना सवय वाईट लागलेली आहे .कर्ज घ्यायचं वेळेत परंतु भरायचं नाही. यामुळे सोसायटी अडचणीत येते व खरच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही. आपली वसुली चांगली असेल तर निश्चितपणे जेवढे कर्ज देता येईल. तेवढे दिले जाईल परंतु आपली नैतिक जबाबदारी आहे .

आपण वेळेत कर्ज भरावे, थकीत कर्जदार राहू नये. कर्ज माफीची वेळ पाहत राहिला तर व्याज वाढेल त्यामुळे अडचणी वाढत्याल. कर्ज परतफेड वेळेत करा. याचा नक्कीच ग्राहकांना चांगला फायदा होईल. आपणाला सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून निश्चितपणे चांगली सेवा देण्याचे काम राहिलं. अडीअडणी सोडविल्या जातील. नाबार्ड ने धोरण बदलले नाही तर लवकरच आंधळी गावामध्ये सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा उभारण्याचे आश्वासन दिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तंटामुक्ती अध्यक्ष बजरंग जाधव यांनी केले. यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक किरण लाड, कुंडलिक ऐडके, सरपंच अमित चव्हाण, उपसरपंच माणिक माने, ग्रामपंचायत सदस्य, अशोक कदम, विजय पवार, अर्जुन माने, मानसिंग जाधव, बॅंक अधिकारी, कर्मचारी, महिला व नागरिक उपस्थित होते.

Post a comment

0 Comments