Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून उद्योग उभारावेत : सौ. रुपाली सपाटे

वाळवा (प्रतिनिधी) : महिलांनी सक्षम होण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून  उद्योग उभारावेत, असे आवाहन पंचायत समिती सदस्या सौ. रुपाली (ताई) सपाटे यांनी केले. गौंडवाडी ता. वाळवा येथे महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. 

यावेळी जल जीवन अंतर्गत जि. प. शाळा हॅन्ड वॉश स्टेशन बांधकाम शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमासाठी उपकार्यकारी अभियंता इस्लामपूर महावितरण ऑफिस सूर्यवंशी साहेब उपस्थित होते.

महीला दिनाच्या निमित्ताने गावातील विशेष महीलांचा  सत्कार करण्यात आला. सुषमा चव्हाण यांनी आपल्या वडीलांना  स्वतःचे यकृत दान करून नवीन जीवनदान दिल्याबद्दल सत्कार संपन्न झाला. कु. प्राची साळुंखे  हिने  इयत्ता 8 वी मध्ये  शिष्यवृत्ती राज्यात 18 वी येऊन यश संपादन केल्याबद्दल सन्मान केला गेला. त्याच बरोबर आरोग्य सेविका भंडारी मॅडम यांचा गावात उत्कृष्ट आरोग्य सेवा पुरवल्याबद्दल तर गावच्या ग्रामसेवक पदभार संभाळणार्या पूनम निकम यांचा ही सत्कार संपन्न झाला. कार्यक्रमासाठी  गावचे सरपंच मा. योगेश लोखंडे, तंटा मुक्त अध्यक्ष्य मा. तुकाराम जाधव उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे आयोजन शीतल चव्हाण उपसरपंच माधुरी चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य विद्या कुंभार ,नीता सुतार , सुमन चव्हाण यांनी केले. कोरोनांचे संपूर्ण नियम पाळूनच गावातील महीलांच्या उपस्थिती हा कार्यक्रम संपन्न झाला.

Post a comment

0 Comments