Daily Mahasatta

Daily Mahasatta

बेणापुर कुस्ती केंद्राच्या ७ मल्लांची महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी निवड

खानापुर ( वैभव कदम)
सांगली येथील शांतिनिकेतन येथे नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी निवड चाचणी स्पर्धेत कै. बाळासाहेब शिंदे कुस्ती संकुलातील ७ मल्लांची विविध वजनी गटात तसेच माती व गादी विभागात महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी निवड झाली आहे, अशी माहिती वस्ताद पैलवान राजेंद्र (तात्या) शिंदे यांनी दिली आहे.

खानापूर घाटमाथ्यावरील बेणापूर येथे कै. बाळासाहेब शिंदे कुस्ती केंद्र २००७ सालापासून कार्यरत आहे. कुस्ती हा ध्यास व श्वास मानुन कुस्तीसाठी अहोरात्र झटणारे मंडळी या गावात आहेत. प्रामुख्याने कै. पै. रावसाहेब (आण्णा) शिंदे, कै. पै. मालोजी (आबा) शिंदे व कै. पै. श्रीरंग (बाबा) शिंदे यांनी कुस्ती जपण्याचे काम केले. त्यांचा वसा व वारसा घेत आदर्श वस्ताद पै. राजेंद्र (तात्या) शिंदे हे जोमाने व निस्वार्थी काम करत आहेत.

दिनांक २६ व २७ फेब्रुवारी सांगली येथील शांतिनिकेतन येथे नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी निवड चाचणी स्पर्धेत कै. बाळासाहेब शिंदे कुस्ती संकुलातील ७ मल्लांची विविध वजनी गटात तसेच माती व गादी विभागात महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यात गादी विभागामध्ये महाराष्ट्र केसरी साठी पै. अक्षय कदम ७४ किलो पै. वैभव शिंदे ७० किलो पै. अनिकेत पाटील ६५ किलो पै. नाथा पवार ६५ किलो माती विभागातून पै. खाशाबा मदने ८६ किलो पै. इंद्रजित शिंदे ६५ किलो तसेच सोलापूर जिल्ह्यातून पै. बबलु सुतार ६५ किलो गादी विभागातून निवड झाली.

या सर्व मल्लांना संकुलाचे वस्ताद पैलवान राजेंद्र (तात्या) शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. मिळवलेल्या यशाचे परिसरातून भरभरून कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments