Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

"ग्राहकांचे वाद वेळेत आणि योग्य पद्धतीने सोडवले जातील !" - प्रा. श्री. एम. डी. पाटील

तासगाव (प्रतिनिधी) :   येथील संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयात "आंतरराष्ट्रीय ग्राहक दिना"च्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात मुख्य वक्ते म्हणून प्रा. श्री. एम. डी. पाटील यांनी सांगितले की, "ग्राहक संरक्षण कायदा -2020 हा भारतात लागू करण्यात आलेला आहे. या कायद्यानुसार ग्राहकांच्या तक्रारींवर तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे. ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्यांना ही ग्राहकांचे हित जपावे लागणार आहे.दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर ही कारवाई करण्यात येणार आहे. ग्राहक वस्तू खरेदी करण्यापूर्वी ही वस्तूच्या गुणवत्तेची तक्रार करू शकणार आहेत."

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रशिक्षणार्थींनींनी स्वागत गीत सादर केले. त्यानंतर प्रा.एम. एस. उभाळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला. त्यानंतर मुख्य वक्ते प्रा. श्री.एम. डी.पाटील यांनी "ग्राहक संरक्षण कायदा 2020" यावर आपले अभ्यासपूर्ण सादरीकरण केले. त्यानंतर प्रा.सौ. पी.एस. घोरपडे यांनी अध्यक्षीय मनोगत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. धनश्री कुंभार यांनी तर आभार अभिव्यक्ती कु. पूनम खराडे यांनी केली.

कार्यक्रमाच्या नियोजनाचे मार्गदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एम. पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ.एम. एस. उभाळे,प्रा.एल.व्ही. भंडारे, प्रा.ए.एस.चिखलीकर, प्रा.ए.टी. पाटील, प्रा.ए.जी.पाटील, श्री. महाडिक, श्री.कुंभार,श्री. वाघमारे व श्री कोठावळे यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments