Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

गौंडवाडीत जि. प.शाळेच्या कामाचा शुभारंभ

गौंडवाडी : जि. प. शाळेच्या इमारत बांधकामाचा शुभारंभ करताना जि. प. सदस्य जितेंद्र पाटील व ग्रामस्थ

वाळवा (रहिम पठाण)
गौडवाडी ता. वाळवा येथे सर्व शिक्षण अभियाना मार्फत जिल्हा परिषद सांगली माध्यमातून व जि. प. सदस्य मा. जितेंद्र पाटील (भाऊ) यांच्या विशेष प्रयत्नातून जि. प. शाळा गौंडवाडी इमारत बांधकामाचा आज शुभारंभ करण्यात आला आहे.

गौडवाडी हे गाव कृष्णा नदीच्या अगदी लगत येत असल्याने पूर परिस्थितीमुळे इमारतीची पडझड झालेली होती. यामुळे नवीन इमारत गरजेची होती. आज जि. प. सदस्य जितेंद्र पाटील यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ झाला.

उदघाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने गौंडवाडीचे सरपंच मा. योगेश लोखंडे , मा. उपसरपंच जालिंदर चव्हाण ग्रामपंचायत सदस्य प्रविण जाधव, विद्या कुंभार माधुरी चव्हाण जेष्ठ नेते मा. रघुनाथ साळुंखे, मा. बाबासो चव्हाण, मा. तुषार चव्हाण, मारुती चव्हाण, सुभाष जाधव, दत्तू कुंभार, नामदेव जाधव, धनाजी भोसले, धनाजी लोखंडे, संदिप जाधव, संदिप चव्हाण, मानसिग कुंभार, ग्रामसेविका पुनम निकम इतर मान्य वर उपस्थित होते.

Post a comment

0 Comments