Daily Mahasatta

Daily Mahasatta

पाटबंधारे विभागाच्या चुकीमुळे वांगी आरोग्य केंद्रास पाण्याचा विळखा : सुरेश मोहिते

कडेगाव , (सचिन मोहिते )
वांगी ( तालुका कडेगाव ) येथील आरोग्य केंद्रास पाण्याचा पडलेला विळखा हा ताकारी पाटबंधारे विभागाच्या चुकीमुळेच पडला आहे, अशी माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य व काँग्रेसचे माजी पक्षप्रतोद सुरेश (काका) मोहिते यांनी दिली आहे.

मोहिते म्हणाले, स्व. डॉ. पतंगराव कदम यांचे अथक प्रयत्नामधून वांगी गावास आरोग्य केंद्र मंजुर झाले आहे. परंतु जेव्हा प्रत्यक्ष बांधकामास सुरवात झाली त्यावेळेपासून या आरोग्य केंद्रास ग्रहण लागल्यासारखे झाले आहे. कारण इमारत बांधकाम भूमीपूजनापासून ते आजपर्यंत प्रत्येक वेळेस राजकिय द्वेष मनात ठेऊन किंवा नको त्या त्रुटी काढून तसेच किरकोळ कारणावरुण बऱ्याचवेळी बांधकाम बंद पाडण्याचे उद्योग झालेले आहेत. परंतु सद्यस्थितीला मात्र आरोग्य केंद्राभोवती जो पाण्याचा विळखा पडला आहे तो ताकारी योजना पाटबंधारे विभागाच्या चुकीच्या नियोजनामुळे पडला आहे.

सदर ठिकाणी मागणी नसताना पाणी सोडण्यात येते. सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा वापर शेतीला होत नसुन त्या पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. जर पाण्याची मागणी होत असेल तर पाटबंधारे विभागाने बंदिस्त पाईपलान करून सदर ठिकाणी पाणी सोडण्याची व्यवस्था केली तर वाया जाणाऱ्या पाण्याचा व आरोग्य केंद्रात साठून रहाणाऱ्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटून जाईल, असे मत सुरेश (काका ) मोहिते यांनी व्यक्त केले .

Post a Comment

0 Comments