Daily Mahasatta

Daily Mahasatta

महापूराचे अनुदान मिळवून देण्यासाठी एजंटगिरी सुरु, कृष्णाकाठचे विदारक चित्र

भिलवडी ( खंडेराव मोरे)

भिलवडी व माळवाडी परिसरात सन २०१९ मध्ये आलेल्या महापुरामुळे पडझड झालेल्या घरांना दुरूस्ती साठी देऊ केलेल्या  ९५ हजार १०० रूपये शासन मदत आनुदानामधील कमिशन लाटण्यासाठी काही ग्रामपंचायत कर्मचारी, स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते या़ंनी थैमान घातल्याचे विदारक चित्र पुरपट्टयात दिसून येत आहे. त्यामुळे अजुनही अनेक वंचित कुटूंब शासनाकडुन मिळणाऱ्या अनुदानासाठी प्रतिक्षेत आहेत.

आॅगस्ट २०१९ मध्ये आलेल्या प्रलयंकारी महापूराने सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील भिलवडी, अंकलखोप, बुर्ली, आमणपूर, दुधोंडी, इ. कृष्णाकाठी वसलेल्या गावांचे प्रचंड आर्थिक व प्रापंचिक नुकसान झालेले आहे. सदर महापुरामुळे काही घरांची पडझड झालेने शासनाने अशा कुटूंबाना आधार देत तातडीने रोख स्वरूपात दहा हजार रुपयांची मदत केली व घरदुरूस्तीसाठी ९५ हजार १००/- रू अनुदान देऊ केले. परंतु या घरपडीचे अनुदान वाटपात प्रचंड गोंधळ झाला असुन अजुनही बरीच कटूंब या अनुदानापासून वंचित राहिलेली आहेत.

सदर अनुदान वाटपातील याद्या मधील लाभार्थ्याकडुन कमिशन मिळवण्यासाठी संबधीत विभागातील पंचायत समितीमधील काही कर्मचारी, ग्रामपंचायत मधील कर्मचारी,  काही राजकीय कार्यकर्ते, व सामजिक कार्यकर्ते यांनी जोरदार फिल्डींग लाऊन  पुरबाधीत कुटूंबाची जणू लूट केली आहे. सदर अनुदानापासुन वंचित कुटूंबांनी पालकमंत्री मा. जयंत पाटील व राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचेकडे प्रत्यक्ष तक्रार केली असता सदर बाबीची चौकशी करून वंचित कुटूंबांना तातडीने अनुदान देणे साठी जिल्हाधिकारी व जि. प. मुख्य कार्यकारी यांना सूचना दिल्या. सदर सुचनेचे पालन करीत जि. प.  सीईओ नी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गुड्डेवार साहेब यांची चौकशाी आधिकारी म्हणुन नेमणुक केली.

नंतर त्यांनी सदर प्रकरणातील चूकीच्या गोष्टींची तपासणी करून गरजू लाभार्थ्यांची घरांचा फेर सर्वे करून लाभार्थी यादी तयार करणेत आली होती. परंतु सदर आनुदानातील कमिशनवर नजर ठेवून आसणारे पंचायत समिती मधील कर्मचारी यांनी काही ग्ग्रामपंचायत कर्मचारी, रोजगार सेवक, व सवंयघोषित राजकिय, सामाजिक कार्यकर्ते  यांना हाताशी धरून कमिशन मिळवण्यासाठी चंग बांधला आहे. भिलवडी व माळवाडी येथील काही एजंट कडुन तर चालू महिन्यात जमा झालेल्या लाभार्थी याचे घरोघरी जाऊन तुम्हाला अनुदान आम्ही मिळवून दिले आहे असे भासवून राजरोस कमिशन मागणेचा चा निर्लज्ज प्रकार घडले ची  चर्चा परिसरात सुरू आहे.

महापूर, कोरोना यासारख्या कठीन प्रसंगातून मार्ग काढत जीवनक्रम पार पाडना-या सामान्य जनतेला मिळना-या शासन अनुदान रक्कमेतून कमिशन साठी वेठीस धरनार-या,  एजंटगीरी करना-यांची साखळी खऱ्या अर्थाने तोडणेच एक मोठे अव्हान कृष्णा काठच्या सामान्य जनतेसमोर आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री जयंत पाटील व राज्य मंत्री विश्वजीत कदम  कृष्णाकाठच्या या हवालदील जनतेला एंजटाच्या मगरमिठीतून सोडविणार का ? हा खरा प्रश्न आहे. 

Post a Comment

0 Comments