Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

कवठेमंहकाळ तहसील कार्यालयात सोशल डिस्टन्सींगचा फज्जा

कवठेमहांकाळ,( अभिषेक साळुंखे)
कवठेमंहकाळ तहसील कार्यालयात सोशल डिस्टन्सींगचा फज्जा उडाला आहे. शासकीय कार्यालयात नागरिकांची मोठी झुबंड झालेली दिसत आहे. शासकीय कार्यालयातच असे बेजबाबदार वर्तन होत असल्याने नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

मार्च महिन्यात आर्थिक वर्ष संपत असल्यामुळे शैक्षणिक शिष्यवृत्तीचे दाखले, कृषी विभागाचे शासकीय अनुदानासाठी अल्प भूधारक दाखले घेण्यासाठी शासकीय कार्यलयात नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचे दिसते आहे. आर्थिक वर्षातील एक दिवस शिल्लक आहे. मात्र महसूल कर्मचारी नागरिकांना मुद्दाम वेठीस धरत आहेत.

अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेळकाढू कामामुळे तहसीलदार कार्यालयात मोठी गर्दी होत आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाचे गांभीर्य नसल्याचे दिसुन येत आहे. किरकोळ कारणासाठी नागरिकांना थांबवले जात आहे. याकडे प्रशासनाने कानडोळा करत असल्याचे दिसत आहे. शासन राज्य स्तरावर कोरोना आटोक्यात आण्यासाठी खुप मोठा प्रयत्न करत आहे. इथे तर अंमल होत नसल्याचे दिसत आहे. मग याला जबाबदार कोण ? प्रशासन कि नागरिक ? असा प्रश्न पडतोय. अर्थातच याप्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे. 

Post a Comment

0 Comments