Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

महापालिकेला २०० कोटींचा निधी 'बक्षीस' स्वरूपात द्यावा : सुरेश पाटील

 

सांगली (राजेंद्र काळे) : महाराष्ट्र शासनाच्या यंदाच्या अर्थसंकल्पात सांगली मिरज कुपवाड महापालिकेसाठी खास निधी म्हणून २०० कोटीचा निधी मंजूर करून देणेत यावा, याबाबतचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांना दिले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा 'व्हिजन सांगली @ ७५' फोरम' चे मुख्य समन्वयक सुरेश पाटील यांनी दिली आहे.

ते म्हणाले, नुकतीच महापौर निवडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षांनी एकत्रित येत भाजपाच्या महापालिकेतील सत्तेला सुरूंग लावत जयंत पाटील यांच्या प्रगल्भ नेतृत्व व मार्गदर्शनाखाली मोठया दिमाखात पक्षाची सत्ता काबीज केली. येणा-या अडीच वर्षामध्ये राज्य शासनाच्या सहकार्याने महापालिका क्षेत्राचा पूर्ण विकास करणे गरजेचे आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या यंदाच्या बजेटमध्ये सां. मि. कु. महानगरपालिकासाठी खास निधी म्हणून २०० कोटीचा निधी मंजूर करून देण्यात यावा. भारतीय जनता पक्षाची राज्यात सत्ता असताना मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगली महानगरपालिकेची सत्ता बीजेपी कडे आल्यानंतर १०० कोटी रूपयांचा निधी सां मि. कु. महापालिकेस बक्षीस स्वरूपात दिला होता.

या सत्ता बदलाचे फळ म्हणून, सध्याची परिस्थतीत पक्षाची सत्ता स्थापन झाली असून, यंदाच्या बजेटमध्ये महापालिकेसाठी किमान २०० कोटीचा निधी बक्षीस स्वरूपात देणे बाबत तरतूद केल्यास, पुढच्या दोन वर्षामध्ये प्रलंबित व नवीन कामे पूर्ण करता येतील. सदर प्रस्तावित कामांमध्ये शेरीनाला ड्रेनेज, शहरातील गुंठेवारी भागातील रस्ते, नवीन डांबरी रस्ते, तसेच नवीन जो डीपी प्लॅन मंजूर झालेला आहे त्याच्या मधील प्रास्तावित डीपी रस्ते, कुपवाड शहरातील हॉस्पिटल, उद्यान, तसेच खुल्या ओपन स्पेस असणा-या जागांना तारेचे कंपाऊंड, छोटी छोटी उद्याने, काळी खण, नवीन प्रस्तावित उद्याने, स्पोर्टस कॉम्प्लेक्स, ट्रक टर्मिनस, सुसज्ज नाटयगृह, वॉडनिहाय्य व्यायामशाळा, ग्रंथालय असे अनेक विकासाभिमुख कामे करता येतील. त्याचा दोन वर्षाचा मास्टर प्लॅन जर आपण बनवून त्याप्रमाणे कार्य केले तर संपूर्ण कामे पूर्णत्वास जाणे शक्य होईल. यासाठी महापालिकेस सदर निधी मंजूर करून देणेची मागणीचे निवेदन व्हिजन सांगली @ ७५' फोरम' च्या वतीने देणेत आलेचे माहिती सुरेश पाटील यांनी दिली. व याबाबत पाठपुरावा करण्यात येत असलेचे त्यांनी सांगितले.


सांगली महापालिकेचे ७१० कोटींचे अंदाजपत्रक सादर


Post a comment

0 Comments