Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

रेठरेधरण येथे एकाच दिवशी ९ कोरोना पॉझिटीव्ह

पेठ (रियाज मुल्ला)
रेठरेधरण ता. वाळवा येथे एकाच दिवशी 1 पुरुष व 8 महिला अशा 9 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती पेठ आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली देवापुरे यांनी दिली.

शहरी भागाबरोबरोबर ग्रामीण भागातदेखील कोरोनाचा शिरकाव होत असून नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. मध्यन्तरी पेठ पासून अवघ्या 4 कि. मी. अंतरावर नेर्ले गावात 6 कोरोना रुग्ण सापडले होते. त्यानंतर पेठ पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या रेठरेधरण या ठिकाणी एकाच दिवशी 9 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.

Post a comment

0 Comments