Daily Mahasatta

Daily Mahasatta

विटा - सांगली रस्त्यावर ' बर्निंग ट्री ' चा थरार


सांगली (प्रतिनिधी) : ऊसाचा पाचोळा पेटवल्यानंतर त्याची आग भडकून रस्त्याकडेच्या वडाच्या झाडाला भीषण आग लागल्याची घटना आज शुक्रवार ता. ५ रोजी तासगाव- सांगली रस्त्यावरील कवठेएंकद जवळ घडली. तासगाव अग्निशमन विभागाने तत्परतेने आग विझवल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

याबाबत अधिक माहिती अशी, कवठेएंकद पासून काही अंतरावर एका शेतकर्यांने उसाचा पाचोळा पेटवला होता. त्यानंतर गवत पेटत गेल्यानंतर मुख्य मार्गावरील वडाच्या झाडाच्या बुंध्याने पेट घेतला. सुमारे तासाभरात आगीने रोद्ररुप धारण केले. झाडाच्या पारंब्या पेटल्यामुळे काही तासातच सुमारे १५ ते २० फुटापर्यंत आग दिसू लागली. महामार्गावरुन जाणार्या प्रवाशांनी काही वेळ या ' बर्निंग ट्री ' चा थरार अनुभवला.

याबाबत काही नागरिकांनी तासगाव अग्निशमन विभागास या दुर्घटनेची माहिती दिली. तासगाव अग्निशमन विभागाने देखील अधिक वेळ न घालवता तत्परतेने ही आग वाढविण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
---------------------------------
पेटलेल्या झाडाची पहाणी करणे आवश्यक :
सदरच्या झाडाच्या बुंध्याला आग लागल्यामुळे हे झाड केंव्हाही कोसळू शकते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या झाडाची पहाणी करावी, तसेच बुंधा जळून गेला असल्यास कोणताही अपघात होण्यापूर्वी हे झाड काढून टाकावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments