Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

खानापूर तालुक्यात कोरोनाचा विस्फ़ोट,

विटा (प्रतिनिधी)

खानापूर तालुक्यात आज कोरोनाचा विस्फोट झाला असून एकाच दिवशी २६ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

खानापूर तालुक्यात पुन्हा एकदा कोरोना चा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. दररोज कोरोनाग्रस्ताचा आकडा वाढत आहे. आज रविवार ता. २८ रोजी दिवसभरात २६ रुग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. यामध्ये विटा शहरातील सर्वांधिक ७ रुग्णांचा समावेश आहे. तसेच कुर्ली- १, मादळमुठी -१, घोटी बु. -२, कार्वे- १, पारे -१, खानापूर-२, लेंगरे-२, नागेवाडी-३, बलवडी खा. -१, ऐनवाडी -१, मोही -१, ढवळेश्वर -१ आणि माहुली - १ असे तालुक्यातील २६ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

एकाच दिवशी २६ इतके रुग्ण पाॅझिटीव्ह आढळून आल्यामुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. 

Post a comment

0 Comments