Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

काँग्रेसच्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी आशा पाटील

सांगली : आशा पाटील, क्रांती कदम, महावीर पाटील, अल्ताफ पेंढारी, सिद्धार्थ कुदळे, स्वप्निल एरंडोलीकर यांना निवडीचे पत्र देताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील व अन्य.

सांगली, (प्रतिनिधी )
काँग्रेसच्या सांगली शहर काँग्रेस कमिटीच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या रविवारी निवडी जाहीर करण्यात आल्या. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष श्री. नाना पटोले यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आणि शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला.

सांगली शहर जिल्हा काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी आशा संजय पाटील यांची तर चिटणीसपदी क्रांती नानासो कदम यांची निवड करण्यात आली आहे. सांगली जिल्हा किसान काँग्रेस सेलच्या जिल्हाध्यक्षपदी महावीर पाटील यांची तर सांगली शहर अल्पसंख्यांक विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी अल्ताफ पेंढारी यांची निवड करण्यात आली आहे. सांगली शहर जिल्हा मागासवर्गीय विभाग अध्यक्षपदी सिद्धार्थ कुदळे तर सांगली शहर जिल्हा सोशल मीडिया मागासवर्गीय विभागाच्या अध्यक्षपदी स्वप्निल एरंडोलीकर यांची निवड करण्यात आली आहे.

--------------------
अधिक वाचा :
Post a comment

0 Comments