Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगलीत राजापूरी हळदीस विक्रमी तीस हजारांचा दर

सांगली ( प्रतिनिधी) : सांगली कृषि उत्पन्न बाजार समिती, सांगली येथे मंगळवारी राजापूरी हळदीने दरांचे सर्व विक्रम मोडीत काढत प्रति क्विंटल ३० हजार इतका उच्चांकी दर मिळवला आहे, अशी माहिती सभापती दिनकर पाटील यांनी दिली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी, मे संगमेश्वर टेडर्स कालाप्या वारद (सबदी) या दुकाना मधील सौद्या मध्ये शेतकरी रामाप्पा बसाप्पा मगोंडर रा. गुरलापूर ता. मुडलंगी जि. बेळगांव यांच्या राजापूरी हळदीला क्किंटला तीस हजार इतका ऐतिहासीक उच्चांकी दर मिळाला. सदरची हळद में विवेक ट्रेडिंग कपंनी यांनी खरेदी केलेली आहे.

या प्रसंगी हळद उत्पादक शेतकरी रामाया बसाप्पा मगोंडर यांचा बाजार समितीच्यावतीने मा दिनकर पाटील (सभापती) सांगली कृषि उत्पन्न बाजार समिती, सांगली यांच्या शुभहस्ते शाल व बुके देवून सत्कार करण्यात आला, व आडते में संगमेश्वर टेडर्स चे मालक काडाप्पा वारद यांचा बाजार समितीचे संचालक मा. जीवन पाटील यांच्या हस्ते शाल व बुके देवून सत्कार करणेत आला. 

या प्रसंगी बाजार समितीचे संचालक मा. वसंतबापू गायकवाड, मा. बाळासाहेब बंडगर, मा. देयगोंड बिरादार, मा. अमर देसाई, बाजार समितीचे सचिव एम. पी चव्हाण, हळद उत्पादक शेतकरी मृत्तप्पा बेटीकाई, सिध्दाप्मा इराप्पा बळगार, इराण्णा कोन्नूर, बाळाप्पा हंदीगंद इत्यादी शेतकरी उपस्थित होते. सदर हळद सौदयासाठी आडते / व्यापारी, खरेदीदार, हळद सोदे विभाग प्रमुख मोहनसिंग रजपूत , हमाल बांधव, तोलाईवार व शेतकरी मोठया संखेने उपस्थित होते. हळद उत्पादक शेतकर्यांनी आपली हळद जास्तीत जास्त विक्री साठी सांगली कृषि उत्पन्न बाजार समिती सांगली येथे आणून सहकार्य करावे, असे आवाहन सभापती दिनकर पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments