Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

बहे सोसायटीच्या अध्यक्ष पदी अशोकराव देशमुख यांची निवड

वाळवा (रहिम पठाण)
बहे ता. वाळवा येथील सर्व सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी श्री. अशोकराव देशमुख यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. वाय. पी. पाटील यांनी काम पाहिले.

यावेळी सत्काराला उत्तर देताना श्री. अशोकराव देशमुख म्हणाले, मला मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करुन सर्वांना समान न्याय देण्याचे काम करेन तसेच प्रत्येक सभासदांना संस्थेच्या माध्यमातून सुविधा देण्याचा व संस्थेचा नावलौकिक वाढवण्याचा प्रयत्न करेन.

निवडीच्या कार्यक्रमावेळी राजारामबापू सह. साखर कारखान्याचे संचालक विठ्ठल पाटील (तात्या), मा. चेअरमन श्री. शिवाजीराव पाटील, श्री. अविनाश खरात, श्री. बाबुराव हुबाले, श्री. सिताराम हुबाले, जयदीप पाटील, लव्हाजीराव देशमुख, मानसिंग पाटील, जालिंदर देशमुख, शंकर खरात, श्रीरंग देशमुख, धनाजी मदने, संजय हुबाले, हणमंत पाटील, सुरेश पाटील, नामदेव कारंडे, संभाजी पाटील, बाबासो मुल्ला, हणमंत पाचुंब्रे, सुभाष आरबुने, रोहीत तोरस्कर, संजय बावचकर, विकास मोहिते, संजय मुळीक, कृष्णा मुसळे, विश्वास मुसळे, अविनाश पाटील, सुरज पाटील, प्रशांत थोरात, भानुदास मोहीते, हणमंत मोहिते, बापूराव मोहीते, दिनकर पाटील, हणमंत आवळेकर, श्रीकांत थोरात, विश्वास सुर्यवंशी, सदाशिव पाटील व सचिव सुधाकर मोहिते, केशव कुंभार सर्व सेवक सभासद ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a comment

0 Comments