Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

विटा पालिकेच्या थकबाकीदारांचे चौकात पोस्टर झळकणार

 

: मुख्याधिकारी अतुल पाटील अॅक्शन मोडवर
विटा (प्रतिनिधी)
मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी स्वच्छ सर्वेक्षणातील दिमाखदार कामगिरी नंतर आपला धडक मोर्चा थकित घरपट्टी, पाणीपट्टी आणि अन्य करांच्या थकबाकी वसूलीकडे वळवला आहे. नागरिकांनी सन २०२० - २१ मधील थकबाकी तातडीने भरुन नगरपरिषदेस सहकार्य करावे, अन्यथा नळ कनेक्शन बंद करणे, जप्ती वॉरंट काढणे यासह थकबाकीदारांच्या नावाचे पोस्टर चौकात झळकवण्याची कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी दिला आहे.

मुख्याधिकारी श्री पाटील यांनी म्हंटले आहे, कोरोनाच्या संकटामुळे यंदा नगरपरिषदेच्या अर्थकारणाला मोठा ब्रेक लागला. शहरातील विकासकामेही रखडली आहेत. कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय करणेसाठी आज पर्यंत मोठया प्रमाणावर खर्च करून नागरिकांसाठी सोयी सुविधा सुरू ठेवल्या आहेत. तसेच पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन इत्यादी अत्याश्यक सेवा नगरपरिषद तत्परतेने बजावत आहे. इथून पुढील काळात देखील नगरपरिषदेला या सेवा सुरू ठेवणेसाठी आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच नगरपरिषदेची एमएसईबी ची देय असलेली वीज बिले, पाटबंधारे विभागात देय असलेली पाणी बीले लॉकडाऊनच्या कालावधीत कर वसूली अभावी थकित आहेत. ती वेळेत न भरल्यास पुढील काळात या सेवा शहरास देणेसाठी आर्थिक संकटातून जावे लागणार आहे.

शहराती मिळकतधारकांना सन २०२० - २१ चे कर लागू
करण्यात आले आहेत. अद्याप पर्यंत काही लोकांनी थकबाकी भरली नाही. त्यांनी ती तात्काळ भरावी. नगरपरिषदेने आता कर वसुलीकर लक्ष केंद्रीत केले आहे. थकबाकीदारांना नोटिसा देणेची कार्यवाही सुरू असून वेळप्रसंगी थकीत कर वसूलीसाठी मालमत्ताचा लिलाव काढला जाणार आहे. चौकाचौकांमध्ये थकबाकीदारांच्या नावाचे डिजिटल फलक लावण्यात येणार आहेत. नळ कनेक्शन बंद करणे, जप्ती वॉरंट काढणे चालू कर व थकबाकी वसूल करण्यासाठी विटा नगरपरिषदेच्या कर विभागाने नोटिसा बजावण्यास सुरवात केली आहे.

कर वसुलीचे संपूर्ण उद्दीष्ट साध्य होणेसाठी कर विभाग प्रयत्नशील आहे. वसुलीसाठी ज्या काही उपाययोजना कराव्या लागतील, त्या करण्याची तयारी कर विभागाने ठेवली आहे. नगरपरिषदेने कोणतीही कर वसुलीसाठी जी कारवाई करेल त्यांची संपूर्ण जबाबदारी संबधित मिळकतधारकांची राहील. त्यावर कोणतीही तक्रार विचारत घेतली जाणार नाही, याची स्पष्ट नोंद घ्यावी. तरी तातडीने थकीत कराची रक्कम भरून नगरपरिषदेस सहकार्य करावे आणि आपले वरील कटू
कारवाई टाळावी, असे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले आहे.


Post a comment

0 Comments