Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

कुपवाडच्या सह्याद्री स्टार्च कंपनीस भीषण आग


कुपवाड (प्रमोद अथणिकर)
      कुपवाड अधोगिक वसाहती मध्ये असणाऱ्या सह्याद्री स्टार्च या कंपनिस आज सोमवार रात्री आठच्या  सुमारास भीषण आग लागली आहे. या दुर्घटनेत कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

    कुपवाड अधोगिक वसाहती मध्ये असणाऱ्या सह्याद्री स्टार्च या कंपनी मध्ये बॉयलर पेटवले जाते. नेहमी प्रमाणे बॉयलर पेटवले असता इतरत्र आग लागली व आगीने रुद्र रुप धारण केले.  कंपनीच्या व्यवस्थापकानी माहिती दिल्यानंतर विलंब न कराता कुपवाड अद्योगिक वसाहती मधील अग्निशामक व सांगली मिरज  महानगरपालिका अग्निशामकच्या गाड्या घटना स्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे .
      या आगीत कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज असून या घटनेची नोंद कुपवाड पोलीस स्टेशन  झाली नाही. ही आग पाहण्यास नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

 

Post a comment

0 Comments