Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाच्यावतीने नूतन महापौर, उपमहापौरांचा सत्कार संपन्न

सांगली जिल्हा शिक्षणसंस्था संघाच्यावतीने नूतन महापौर, उपमहापौरांचा सत्कार करताना रावसाहेब पाटील व अन्य. 

सांगली (राजेंद्र काळे )
सांगली मिरज आणि कुपवाड चे नूतन महापौर पदी सन्माननीय निवडीबद्दल मा. दिग्विजय सूर्यवंशी यांचा व नूतन उपमहापौर पदी सन्माननीय निवडीबद्दल मा . उमेश पाटील यांचा सांगली जिल्हा शिक्षणसंस्था संघाच्या वतीने शिक्षणसंथा संघाचे पदाधिकार्यांनी महापालिकेत सत्कार केला.

यावेळी शिक्षणसंस्था संघाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी शिक्षणसंस्था संघाचे कार्य आणि शिक्षणसंस्थांचे विविध प्रश्न याची माहिती नूतन महापौरांचा व उपमहापौरांना दिली. या सत्कारास उत्तर देताना श्री. दिग्विजय सूर्यवंशी यांनी सांगली जिल्हा शिक्षणसंस्था संघास लागेल ते सहकार्य देण्याचे आश्वासित केले. शिक्षणसंस्था संघाच्या कार्यलयासाठी महापालिका स्तरावर जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

यावेळी मा. दिग्विजय सूर्यवंशी यांचा सत्कार श्री रावसाहेब पाटील व मा. उमेश पाटील यांचा सत्कार श्री आर एस चोपडे यांनी केला. याप्रसंगी सर्वश्री अरुण पाटोळे, अरुण दांडेकर, प्रा. एम . एस . राजपूत, प्रा. ऐनापुरे, शिवपुत्र आरबोळे उपस्थित होते.Post a Comment

0 Comments