Daily Mahasatta

Daily Mahasatta

महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी शिराळ्यातील एकास जन्मठेप

इस्लामपूर ता.( प्रतिनिधी )
महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी एकास जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. अरुण उर्फ बाबू सनिल जगदाळे (वय-२० वर्षे रा. सोनवडे, ता. शिराळा असे जन्मठेप शिक्षा झालेल्याचे नाव आहे. या केसची सुनावणीअतिरिक्त जिल्हा व रात्र न्यायाधिश श्री. एस. सी. मुनघाटे यांच्यापूढे झाली.

याबाबत अधिक माहिती अशी दि. ०९ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी ६. ३० वाजण्याच्या सुमारास आरोपी अरुण याने यातील पीडित महिलेला गगनगिरी हॉटेल आरळा येथील आपले काम संपवून घरी परत येत असताना निर्जन ठिकाणी रस्त्यात अडवून "तु मला आवडतेस'' असे म्हणून तिच्या अंगाशी झोंबा -झोंबी केली. त्यावेळी तिने प्रतिकार करुन हकलून दिले. परंतू त्याने रागाने पुन्हा फिर्यादीच्या डाव्या बरगडीवर हाताने जोरात दोन ते तीन वेळा मारहाण करत गंभीर दुखापत करुन कॅनॉलमध्ये ढकलून दिले. पीडित कॅनॉलमधून वर आलेवर तिला पुन्हा ढकलून जमिनीवर पाडून तिच्या इच्छेविरुद्ध शरीर संबंध केला.हा प्रकार कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकीदेवून निघून गेला होता. याबाबतचा कोकरुड पोलिस ठाणेत गुन्हा नोंद केला होता. अरुण जगदाळे यास ७ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा, कलम ३२५ मध्ये ३ वर्षे सश्रम कारावास, १ महिना सश्रम कारावास व ३०००/- रुपये दंड व दंड न भरलेस ६ महिना साधा कारावासाची शिक्षा
ठोठवणेत आली.

या केसमध्ये सरकारी पक्षातर्फे एकूण ६ साक्षीदार तपासणेत आले . त्यापैकी फिर्यादी, पंच, मेडीकल ऑफिसर डॉ.सलमा जमादार, डॉ.देसाई व तपासी अंमलदार दत्तात्रय बी. कदम, ए.पी.आय यांची साक्ष महत्त्वाची ठरल्या. सरकारी वकील म्हणून रणजित एस. पाटील यांनी काम पाहिले.

Post a Comment

0 Comments