Daily Mahasatta

Daily Mahasatta

विद्युत मोटारीचा शॉक लागून शेतकर्याचा मृत्यू


शिराळा,( विनायक गायकवाड)
नाटोली( ता. शिराळा) येथील शेतकरी आनंदा ज्ञानू भोसले (वय -४६ ) यांचा विद्युत मोटारीचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. याबाबत शिराळा पोलिसात अशोक ज्ञानू भोसले( वय - ५५ ) यांनी वर्दी दिली आहे.

पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, मृत आनंदा ज्ञानू भोसले हे आपल्या नाटोली येथील मळीच्या शेतात पाणी पाजण्यासाठी शुक्रवारी (ता. १९) रोजी सकाळी ०५. ३० वाजण्याच्या सुमारास जातो म्हणुन घरातुन निघुन गेले. त्यानंतर थोड्या वेळात शेतात जनावरांना वैरण घालण्यासाठी आनंदाचा भाऊ अशोक गेले. दरम्यान साडे नऊ वाजण्याच्या सुमारास अशोक शेतात असताना शेजारी रामचंद्र सदाशिव पाटील यांनी आनंदा यास विद्युत मोटारीचा शॉक लागल्याची माहिती दिली. त्यास शिराळा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले. त्यावेळी त्यांचा मृत्यू झाला होता. डॉ. अनिरुद्ध काकडे यांनी शवविच्छेदन करून शॉक लागून मृत्यू झाला असल्याचे सांगितले. पुढील प्राथमिक तपास पोलीस हावलदार शिवाजी जाधव करत आहेत. त्यांच्या पश्चयात आई, पत्नी, दोन मुली, मुलगा, दोन भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments