Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

विट्यात १० पाॅझिटीव्ह, एकाच कुटुंबातील सहाजणांचा समावेश

विटा (प्रतिनिधी)
खानापूर तालुक्यात आज सोमवार ता २९ रोजी १३ लोकांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आले असून यामध्ये विटा शहरातील एकाच कुटुंबातील सहाजणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. अनिल लोखंडे यांनी दिली आहे.

सांगली महापालिका क्षेत्रासह ग्रामीण भागात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. आज सोमवारी सांगली जिल्ह्यात २०५ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तर आटपाडी, पलूस, जत आणि वाळवा या तालुक्यात प्रत्येकी एक याप्रमाणे ४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

खानापूर तालुक्यातील आजचे कोरोना बाधित रुग्ण पुढीलप्रमाणे : विटा - १०, घानवड -१, खानापूर-१, मादळमुठी-१ असे १३ रुग्ण खानापूर तालुक्यात आढळून आले आहेत. तालुक्यात आजअखेर २ हजार ८३६ रुग्ण कोरोना पाॅझिटीव्ह आढळून आले असून यापैकी २ हजार ६४३ रुग्णानी कोरोना वर मात केली आहे. तर तालुक्यात एकूण ७३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सद्या १२० रुग्ण उपचाराखाली आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डाॅ अनिल लोखंडे यांनी दिली आहे.

Post a comment

0 Comments