Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

वीज बिल भरणेस सवलत द्या ; कुपवाड शहर व्यापारी संघटनेची मागणी

कुपवाड (प्रमोद अथणिकर)
गेल्या कित्येक दिवसा पासून कोरोना या महाभयंकर रोगाने घातलेल्या थैमानाने व्यापारी वर्ग पूर्ण डबघाईस आला आहे. अशातच लाईट बिलाची वसुली जोमात चालू आहे. या विरोधात कुपवाड शहर व्यापारी संघटनेचे वतीने लाॅकडाऊन काळातील स्थिर आकार रद्द करा व वीज जोडणी न तोडता बिलाचा हप्ते स्वरूपात भरणा करून घ्यावा, असे निवेदन कुपवाड व्यापारी संघटने मार्फत आज कुपवाड एम एस ई बी च्या अधिकाऱ्यांना देण्यात आले.

यावेळी कुपवाड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अमर दिडवळ ,उपाध्यक्ष बिरु आस्की , अनिल कवठेकर , रमेश जाधव , शाम भाट , विठ्ठल संकपाळ , अभिजित कोल्हापुरे , राजू खोत व अनिल गडदे आदी उपस्थित होते

Post a comment

0 Comments