Daily Mahasatta

Daily Mahasatta

विटेकरांनो... आधुनिक शेतीची पध्दत अंगीकारा : सुहास बाबर

 विटा (प्रतिनिधी) : मतदारसंघात जवळपास सर्वच भागात आमदार अनिलभाऊ बाबर यांचे अथक प्रयत्नातून टेंभुचे पाणी आल्यामुळे शेतीच्या कामांना गती आली आहे. आता विट्यातील शेतकरी बांधवांनी शेतात आधुनिक प्रयोग करून आपले आर्थिक जीवनमान उंचावावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी केले. ते विटा येथे आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती मधून मंजूर झालेल्या बंधाऱ्याच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते.

यावेळी बाबर म्हणाले, विटा परिसरातील चारही वाडीवरील लोकांनी शेतीतील अधुनिकीकरणाची पद्धत अवलंबून आपल्या शेतीमधून भरघोस उत्पन्न घेऊन आपले आर्थिक जीवनमान उंचावावे. विट्यात मूळ व्यवसाय यंत्रमाग, पोल्ट्री आहे. परंतु सध्या हे दोन्हीही व्यवसाय मंदीतून जात आहेत. आता त्यास पूरक व्यवसाय म्हणून शेती हा उत्तम पर्याय आहे जर शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी असेल आणि योग्य प्रकारे नियोजन केले तर शेतीमधून हमखास फायदा मिळू शकतो. विट्यात अजूनही बरीच शेती करण्यासारखी जमिन शिल्लक असून लोकांनी त्याची मशागत करून त्यातून उत्पन्न घेण्यास सुरुवात करावी असे आवाहन ही त्यांनी केले. लवकरच आमदार अनिलभाऊ हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वस्त्रोद्योग मंत्री मा अस्लम शेख यांची वेळ घेऊन या भागातील यंत्रमाग धारकांच्या अडचणीवर चर्चा करणार आहेत. त्यातूनही निश्चितच सकारात्मक मार्ग निघेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

यावेळी प्रकाश भाऊ गायकवाड मुरलीधर (आबा) गायकवाड ज्ञानेशवर गायकवाड (माऊली), नगरसेवक अमर शितोळे, जिल्हा युवा सेना प्रमुख अॅड मिलिंद दादा कदम, विटा शहर शिवसेना प्रमुख राजू भैय्या जाधव, समीर कदम, दत्तात्रय गायकवाड, अनिल हराळे, अंकुश हराळे, शिवाजी भोसले, सतीश हराळे, अक्षय गायकवाड, सुभाष गायकवाड, खंडू गायकवाड, किरण जाधव, सुनील मेटकरी, विजय गायकवाड, राजू राठोड, आधीक गायकवाड, संपत कदम, रणजित जाधव आदी प्रमुख मान्यवर व परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते

Post a Comment

0 Comments