Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत कु. मयुरी शेंडगे यांचा द्वितीय क्रमांक

तासगाव (प्रतिनिधी)
येथील संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील द्वितीय वर्षातील विद्यार्थीनी कु. मयुरी रवींद्रनाथ शेंडगे यांनी राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. 'यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स कराड' यांनी आयोजित केलेल्या 'यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत' कुमारी मयुरी शेंडगे यांनी महाविद्यालयातर्फे सहभाग घेतला होता.

त्यांच्या निबंधाचा विषय "मा. यशवंतराव चव्हाण साहेब यांची संरक्षण नीती" हा होता. अनेक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्या सर्व विद्यार्थ्यांमधून त्यांना द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. एकूण 200 गुणांपैकी 168 गुण त्यांना मिळाले. पुरस्काराचे स्वरूप रू.4000/- स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे होते.

महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. बी. एम. पाटील व डॉ. एम. एस. उभाळे यांचे त्यांना मार्गदर्शन मिळाले. तसेच प्रा‌. सौ. पी. एस. घोरपडे, प्रा. सौ. एल. व्ही. भंडारे, डॉ. ए. एस. चिखलीकर, डॉ. ए. टी. पाटील व ग्रंथपाल प्रा. ए. जी. पाटील यांचे त्यांना बहुमोल सहकार्य लाभले. महाविद्यालयाचे प्राचार्य व सर्व प्राध्यापक वर्ग व प्रशासकीय सेवक यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Post a comment

0 Comments