Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

सांगलीत भरवस्तीत बिबट्या घुसला, सीसीटीव्ही च्या माध्यमातून शोध सुरु


सांगली (प्रतिनिधी)
सांगली शहरातील राॅकेल लाईन, पटेल चौक परिसरात आज बुधवारी सकाळी बिबट्या घुसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या बिबट्याला पकडण्यासाठी पटेल चौक, स्टेशन चौक आणि राजवाडा चौक पोलीसांनी सील केला आहे.

आज बुधवारी सकाळी काही नागरिकांनी पटेल चौक परिसरात एक बिबट्या आल्याचे पाहिले. त्याने राजवाडा चौकातील एका बँकेजवळ कुत्र्यावर हल्ला करुन त्याला ठार केले. याबाबत ची माहिती मिळताच नागरिकांनी बिबट्या पहायला प्रचंड गर्दी केली. हा बिबट्या पलूस मार्गे आल्याची शक्यता वर्तवली जात आहे

बिबट्यास पकडण्यासाठी वन विभागातील अधिकारी तसेच सांगली शहर पोलीस स्टेशन चे अधिकारी आणि महापालिका कर्मचारी यांनी संयुक्तरित्या शोध मोहीम राबवली आहे. महापालिकेच्यावतीने परिसरातील सीसीटीव्ही ची तपासणी करुन बिबट्याचा शोध घेतला जात आहे,  अशी माहिती सांगली महापालिकेच्या अग्निशमन दलाचे प्रमुख चिंतामणी कांबळे यांनी सांगितले आहे.
     आमदार सुधीर गाडगीळ, माजी उपमहापौर धीरज सुर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रशासनाला सुचना दिली. तसेच नागरिकांनी गर्दी न करता सहकार्य करावे असे आवाहन आमदार सुधीर गाडगीळ यांनी केले आहे. 


 

Post a comment

0 Comments