Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

शांताराम (बापू ) कदम यांच्या हस्ते वांगीचे उपसरपंच संजय कदम यांचा सत्कार

सचिन मोहिते (कडेगाव) : वांगी गावचे उपसरपंच म्हणून श्री संजय कदम यांची बिनविरोध निवड झालेली आहे . सदर झालेल्या निवडीबद्दल विद्यमान उपसरपंच श्री. संजय कदम यांचा सत्कार सागरेश्वर सूतगिरणीचे चेअरमन मा. शांताराम (बापू) कदम यांनी केला.

यावेळी माजी जि. प. सदस्य सुरेश मोहिते (काका), माजी उपसरपंच राहुल सांळुखे, विठ्ठल देव सोसायटीचे माजी चेअरमन राजेंद्र पाटील इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते . उपसरपंचपदाचा नावलौकिक वाढवत स्वच्छ व पारदर्शक कारभार करा. तसेच समाजातील सर्व तळागाळातील घटकापर्यंत पोहचून त्यांच्या असणाऱ्या अडी - अडचणी समजावून घेऊन तात्काळ सोडवणेचा प्रयत्न करत रहा. निपक्षपणे समाजकार्य करा, असे सांगून पूढील वाटचालीसाठी मा शांताराम (बापू) कदम यांनी उपसरपंच संजय कदम यांना शुभेच्छा दिल्या .

Post a comment

0 Comments