Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

' मुलूखमाती ' मुळे मराठी साहित्यात मोलाची भर पडेल : डॉ. विश्वजित कदम

देवराष्ट्रे : संपत मोरे लिखित मुलूखमाती या  पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, आ. विक्रम सावंत, डाॅ. रणधीर शिंदे, लेखक संपत मोरे यांच्यासह मान्यवर. 

कडेगाव ( सचिन मोहिते ) : मुलूखमाती" या पुस्तकामध्ये लेखक संपत मोरे यांनी  उपेक्षित माणसांचे शब्दचित्र रेखाटले आहे. मुलूखमातीने मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे," असे मत कृषिराज्यमंत्री डॉ विश्वजित कदम यांनी देवराष्ट्रे  येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सभागृहात व्यक्त केले. 

संपत मोरे यांनी लिहिलेल्या मुलूखमाती या व्यक्तीचित्रणात्मक पुस्तकाचे प्रकाशन राज्यमंत्री  डॉ. विश्वजित  कदम यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार विक्रम सावंत, मराठी साहित्याचे समीक्षक डॉ. रणधीर शिंदे, कडेगावच्या प्रांताधिकारी आयुषी सिंह व गणेश मरकड, तहसीलदार शैलजा पाटिल, जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र आप्पा लाड, युवा नेते डॉ. जितेश कदम उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन कडेगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने  करण्यात आले होते. यावेळी  पी सी जाधव, पोपटराव महिंद, मोहनराव मोरे, माजी जि. प. अध्यक्षा मालनताई मोहिते आदी उपास्थित होते. यावेळी लेखक संपत मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत प्रस्ताविक प्रताप महाडीक यांनी केले. आभार सर्जेराव खरात यांनी मानले.

Post a comment

0 Comments