Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी पेठ नाक्यावर भाजपची निदर्शने

पेठ (रियाज मुल्ला)
महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तातडीने राजीनामा द्यावा, या मागणीकरिता पेठ नाका येथे भारतीय जनता पक्षातर्फे भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यसमिती सदस्य सम्राट बाबा महाडिक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महाराष्ट्र राज्याची बदनामी केली आहे. त्यामुळे त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली
यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती जगन्नाथ माळी, वाळवा पश्चिम मंडळ अध्यक्ष सी. एच. पाटील, सांगली जिल्हा चिटणीस संजय घोरपडे, वाळवा तालुका भाजपा सरचिटणीस डॉ. सचिन पाटील, सांगली जिल्हा भाजपा कार्यकारिणी सदस्य राजेंद्र पाटसुते, वाळवा तालुका भाजप विद्यार्थी आघाडी अध्यक्ष प्रवीण चिकुर्डेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पेठ चे उपसरपंच चंद्रकांत पवार, माजी उपसरपंच अमिर ढगे, विश्वास पाटील,असिफ जकाते, अनिकेत सूर्यवंशी, अभिमन्यू कदम, अजित पाटील, अक्षय खिलारे यांच्यासह इतर पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments