Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

पाणीपट्टी करात अभय सवलत योजना राबवा - पृथ्वीराज पाटील


सांगली : सांगली, मिरज, कुपवाड महापालिका हद्दीतील पाणीपट्टीमध्ये सवलत योजना चालू करावी, या मागणीचे पत्र काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी आयुक्त नितीन कापडणीस यांना दिले.

सांगली (प्रतिनिधी) : सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रात मालमत्ता कराच्या धर्तीवर पाणीपट्टी करामध्ये दंड/ शास्तीची अभय सवलत योजना राबवावी, यासाठीचे पत्र आज काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी आयुक्त श्री. नितीन कापडणीस यांना भेटून दिले.

 महानगरपालिकेने मालमत्ता करात दंड /शास्ती व्याज थकीत असलेल्या ग्राहकांसाठी शंभर टक्के सवलतीची अभय योजना राबवली आहे, त्याच धर्तीवर पाणीपट्टी करात दंड /शास्ती व्याज थकीत असलेल्या ग्राहकांसाठी शंभर टक्के सवलतीची अभय योजना राबवावी अशी मागणी नागरिकांनी कॉंग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या कडे केली होती नागरिकाची मागणी आज मा.आयुक्त नितीन कापडणीस यांना भेटून या निवेदनद्वारे दिली मा.आयुक्त यांनी या बाबत सकारात्मक भूमिका घेतली असून लवकरच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करू असे सांगितले.

यावेळी श्री. पाटील यांच्यासमवेत नगरसेवक संजय मेंढे, माजी नगरसेवक अल्ताफ पेंढारी, इरफान शिकलगार, सनी धोत्रे, अजय देशमुख, विजय पाटील उपस्थित होते.

Post a comment

0 Comments