Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

सांगली महापालिकेतील प्रभाग ९ च्या अध्यक्ष पदी अशोक वारे

सांगली (प्रतिनिधी)
सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यात येत आहे. त्यानुसार प्रत्येक प्रभागात पदाधिकारी नेमण्यात येत आहे. सांगलीतील प्रभाग क्रमांक ९ च्या अध्यक्ष पदी अशोक रामचंद्र वारे यांची नेमणूक करण्यात आली आहे, अशी माहिती काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिली आहे.

पृथ्वीराज पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून वारे यांची निवड जाहीर केली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली समाजाच्या सर्व स्तरात विशेषतः तळगाळातील शेवटच्या माणसांपर्यंत काँग्रेस पक्ष पोहचवणे आवश्यक आहे. त्यामुळे काँग्रेसच्या प्रभाग निहाय समिती बनविण्यात येत आहेत, अशी माहिती काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिली आहे. अध्यक्ष अशोक वारे यांचा निवडीबद्दल जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने सत्कार करण्यात आला. 

Post a comment

0 Comments