Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

उपसरपंच निवडीच्या वादातून ग्रामपंचायत सदस्याचा खून

: बोरगाव (ता. कवठेमहांकाळ ) येथील घटना

कवठेमहांकाळ (प्रतिनिधी)
येथील बोरगाव (ता. कवठेमहांकाळ ) ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडीवेळी झालेल्या तुंबळ हाणामारीत पांडूरंग जनार्दन काळे (वय ५७) या ग्रामपंचायत सदस्याचा खून झाला आहे. ही दुर्घटना गुरुवार ता. ४ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी, बोरगाव (ता. कवठेमहांकाळ ) ग्रामपंचायतीत नामदेव पाटील यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडीसाठी  बुधवारी (दि. ४) विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान ग्रामपंचायतीमध्ये अकरा पैकी आठ सदस्य खासदार संजय पाटील गटाचे तर तीन सदस्य आमदार सुमन पाटील गटाचे आहेत. यातील खासदार संजय पाटील गटाचे दोन सदस्य फोडून आपला उपसरपंच करण्याची रणणिती आमदार पाटील गटाने आखली होती.

आज गुरुवारी दुपारी उपसरपंच निवडीचा कार्यक्रम सुरु होताच ग्रामपंचायत सदस्य मतदानासाठी येत असताना ग्रामपंचायतीच्या इमारतीसमोर दोन्ही गटाचे समर्थक एकमेकांना भिडले. काठ्यांच्या सहाय्याने  हाणामारी सुरु झाली. हाणामारीत ग्रामपंचायत सदस्य पांडूरंग जनार्दन काळे यांना काठ्यांचा मार बसल्याने गंभीर जखमी झाले. उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जात असतानाच त्यांचा  मृत्यू झाला. या हाणामारीत गणेश पाटील हे आणखी एक सदस्य गंभीर जखमी झाले आहेत. शिवाय आठ ते दहा कार्यकर्तेही जखमी झाले आहेत. या घटनेनंतर कवठेमंहाळ परिसरात तणावाचे वातावरण आहे.





 

Post a comment

0 Comments