Daily Mahasatta

Daily Mahasatta

कुपवाडचा तलाठी किरण कवाळे निलंबित : प्रांताधिकारी समीर शिंगटे यांची कारवाई

कुपवाड (प्रमाोद अथनिकर) : चावडी कार्यालयातील नोंदीबाबतचे मुळ अर्ज गहाळ करणे, कार्यालयात अनुपस्थित राहणे, वरिष्ठांच्या सुचनांचे जाणिवपूर्वक अवहेलना करणे असे प्रकार करत मनमानी कारभार करणार्‍या कुपवाड चावडीतील तलाठी किरण कवाळे याचे शासकीय सेवेेतून निलंबन करण्यात आले आहे. प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी याबाबत आज मंगळवारी आदेश जारी केला आहे.

कुपवाड चावडीतील तलाठी किरण कवाळे याच्याबाबात नागरिकांतून मोठ्या प्रमाणात तक्रारी होत्या. कवाळे हे कार्यालयीन वेळेत अनुपस्थित राहत होते. तसेच नोंदीसाठी दिलेले अर्ज त्यांनी गहाळ केले होते. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तमराव कांबळे यांनी कवाळे यांची चौकशी करून त्यांना निलंबित करावे, अशी मागणी केली होती. नागरिकांच्या तक्रारी नंतर देखील कवाळे यांच्या वागण्यात कोणताच फरक पडला नव्हता. त्यामुळे अप्पर तहसीलदार सांगली यांनी तलाठी किरण कवाळे यांचे निलंबन करण्याबाबत प्रांताधिकारी यांना प्रस्ताव सादर केला होता.

या प्रस्तावाचा विचार करून आज तलाठी किरण कवाळे यांचे निलंबन करण्यात आल्याचे आदेश प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी दिले आहेत. निलंबन कालावधीत तलाठी कवाळे यांचे मुख्यालय तासगाव हे राहील, तसेच तासगाव तहसीलदार यांची परवानगी घेतल्याशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही, असे आदेशात म्हंटले आहे. 


Post a Comment

0 Comments