Daily Mahasatta

Daily Mahasatta

पवनचक्की एजंटाचे आमदारांवरील आरोप बिनबुडाचे : नाना शिंदे


जत (सोमनिंग कोळी)
तालुक्यात आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या माध्यमातून तालुक्यात विविध विभागातून ५५ कोटी रुपयांची विकास कामे सुरू आहेत. कोरोना महामारीच्या काळात मोलाचे योगदान दिले. मात्र, पवनचक्कीत एजंटचा धंदा करणारे आमदरांवर टक्केवारीचा आरोप करतात. याचा अभ्यास करून विरोधकांनी बोलावे, अशी टीका काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुजय शिंदे यांनी केली.

तर आमदरांना एकेरी भाषेतून बोलणाऱ्या भाजप कार्यकर्त्याचा काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी नगरसेवक भुपेंद्र कांबळे,विक्रम फौंडेशनचे अध्यक्ष युवराज उर्फ बाळ निकम, ज्येष्ठ नेते अशोक बन्नेनवर, नगरसेवक संतोष कोळी, माजी नगरसेवक महादेव कोळी, समाधान शिंदे,आदी उपस्थित होते.

यावेळी नगरसेवक भुपेंद्र कांबळे म्हणाले, आमदार विक्रमसिंह सावंत यांनी पूर्व भागाला पाणी मिळण्यासाठी आज अखेर प्रयत्न केले आहे. सायफन पध्दतीने पाणी जत तालुक्यातील गावांना मिळते हे अनेकवेळा सिध्द झाले असून विरोधी माजी आमदार विलासराव जगताप यांनी या उलट विधानसभेत पोलिसांविषयीच भूमिका मांडल्या.

विक्रम फौंडेशनचे अध्यक्ष युवराज उर्फ बाळ निकम म्हणाले, भाजपमध्ये पदाधिकाऱ्यांचा ताळमेळ नाही. विकासकामात नेहमी खोडा घालणे हा एकच कार्यक्रम केला. उलट आमदार विक्रमसिंह सावंत यांना टिकेचे लक्ष केले. त्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आपली मर्यादा ओळखून टीका करावी अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल. असा इशारा दिला.

Post a Comment

0 Comments