Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

अखेर पेठच्या यात्रेबाबत महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर

पेठ (रियाज मुल्ला)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 11 मार्च ते 16 मार्च या कालावधीत होणारी पेठ ता. वाळवा येथील खंडेश्वर माणकेश्वर देवाची यात्रा जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून रद्द करण्यात आली असून पेठ ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

10 मार्च ते 16 मार्च अखेर खंडेश्वर माणकेश्वर हे दोन्ही देवालय बंद ठेवण्यात येणार आहेत .यावेळी दोन्ही देवाचे मानकरी व पुजारी उपस्थित होते. गुलाल भंडाऱ्याची उधळण होणारी पश्चिम महाराष्ट्रातील ही एकमेव यात्रा असून महाराष्ट्र - कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारी यात्रा म्हणजे पेठेची खंडेश्वर माणकेश्वर यात्रा. मात्र कोरोना च्या वाढत्या संसर्गामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशा नुसार व ग्रामपंचायत पेठ च्या ठरलेल्या मीटिंगमध्ये यावर्षीची यात्रा रद्द करण्यात आली असून दर्शनासाठी ही मंदिरे बंद ठेवण्यात येणार आहेत.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य सम्राट महाडिक, जिल्हा परिषद बांधकाम सभापती जगन्नाथ माळी, उपसरपंच चंद्रकांत पवार, तंटामुक्तीचे अध्यक्ष धनपाल माळी, माजी उपसरपंच शंकर पाटील, माजी उपसरपंच आमिर ढगे ,देवस्थान कमिटी उपाध्यक्ष राहुल पाटील, ग्राम विकास अधिकारी एम.डी. चव्हाण, बबन मगदूम  ,संजय काटकर, शहाजी चव्हाण, विकास दाभोळे, नामदेव भांबुरे ,विकास पेठकर, वृत्तपत्र विक्रेते हणमंत जाधव 
आदी मान्यवर  उपस्थित होते.

Post a comment

0 Comments