Daily Mahasatta

Daily Mahasatta

मुस्लीम समाजाच्या मागणीची पूर्तता, राष्ट्रवादीने दिला ६७ लाखांचा निधी

जत : येथील विविध विकास कामासाठी निधी दिल्याबद्दल मुस्लिम समाज बांधवांनी सुरेश शिंदे, अमोल डफळे यांचा सत्कार केला.

जत (सोमनिंग कोळी)
जत शहरातील उमराणी रस्त्यावर असणारे मुस्लिम समाज दफनभूमी आणि विठ्ठल नगर येथील अर्धवट कामाची पूर्तता यासाठी जत शहर मुस्लिम समाजाने केलेल्या मागणीची गांभीर्याने दखल राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे. येथील दोन्ही कामांसाठी राष्ट्रवादीने पुढाकार घेत थेट ६७ लाखाचा निधी मंजूर करून प्रत्यक्ष कामालाही सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे मुस्लीम समाजाच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी प्रामुख्याने पुढाकार घेतलेले मंत्री जयंत पाटील यांचे स्वीय सहायक अमोल डफळे, राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे यांचा एका छोटेखानी समारंभात सत्कार करण्यात आला.

मुस्लिम समाज बांधवांच्या दोन ठिकाणी दफनभूमी आहेत. यातील एक उमराणी रस्त्यावर तर दुसरी विठ्ठल नगर येथे आहे. या दोन्ही दफनभूमीच्या कामासाठी आजवर गांभीर्याने कोणी पाहत नव्हते. येथे समाजातील कोणी मयत झाल्यास त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. नेहमी होणारी हेळसांड लक्षात येऊन समाजाचे तरुण नेते सद्दाम भाई अत्तार यांनी गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा सुरू केला होता.

त्यांनी माजी आमदार विलासराव जगताप राष्ट्रवादीचे नेते सुरेशराव शिंदे, उपनगराध्यक्ष आप्पा पवार , कार्याध्यक्ष उत्तम शेठ चव्हाण, भाजपा शहराध्यक्ष अण्णा भिसे यांना सोबत घेत अमोल डफळे यांची भेट घेतली होती. त्यानुसार अमोल डफळे यांनी उमराणी रोडवरील येथील मुस्लिम समाजाचे दफनभूमीसाठी १७ लाख ५० हजार रुपयांचा निधी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडून मंजूर घेतला व विठ्ठल नगर येथील अर्धवट काम मंजूर रस्त्याच्या कामासाठी ३० लाख रुपये निधी यासाठी उपनगराध्यक्ष आप्पा पवार यांच्याकडे पाठपुरावा करत त्यांनी हे काम तातडीने सुरू करून पूर्ण करून घेतले.

Post a Comment

0 Comments