Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

एमपीएससी परिक्षा रद्द, सांगलीत भाजपकडून रस्ता रोको

सांगली (प्रतिनिधी)
महाराष्ट्र सरकारने दि. १४ मार्च रोजी होणारी राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा अचानकपणे रद्द केल्याच्या निषेधार्थ सांगलीत भारतीय जनता पक्षातर्फे पोलीस मुख्यालयासमोरील रस्त्यावर आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको करून जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी सरकारच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. रास्तारोको केल्यामुळे त्याठिकाणची वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती.

याबाबत बोलताना आमदार सुधीरदादा गाडगीळ म्हणाले,'येत्या १४ मार्च रोजी राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा होणार होती. त्यासाठी संपूर्ण राज्यातील मुला-मुलांनी यापरीक्षेसाठी जोरदार तयारी केली होती. सरकारने परीक्षेच्या अवघ्या ३ दिवस अगोदर परीक्षा रद्द केल्याचे जाहीर करून  सर्व विद्यार्थ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरवले आहे. परीक्षा रद्द झाल्यास विद्यार्थ्यांचे श्रम वाया जाणार आहेत. ऐनवेळी परीक्षा रद्द करून सरकार विद्यार्थ्यांचा अंत बघत आहे.

कोणत्याही परिस्थतीत सरकारने १४ तारखेलाच परीक्षा घेतली पाहिजे. सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरु आहे. विधानसभेचे अधिवेशन झालंय मग सरकारला परीक्षा घेण्यात काय अडचण आहे. सरकारने परीक्षा रद्दचा निर्णय त्वरित रद्द करून १४ मार्चला होणारी राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा ही त्याच दिवशी घ्यावी असे सांगितले.

आंदोलनात माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी, दीपक माने, नगरसेवक सुब्राव मद्रासी, दीपक माने,प्रियानंद कांबळे, राहुल माने, विश्वजित पाटील, किरण भोसले, प्रथमेश वैद्य, अश्रफ वांकर, अनिकेत खिलारे, अमित भोसले यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी सहभागी झाले होते.

Post a comment

0 Comments