Daily Mahasatta

Daily Mahasatta

कुपवाडात डिझेल चोरीचे रॅकेट उघडकीस

कुपवाड : येथील डीझेल चोरीतील संशयित आरोपी व मुद्देमाला समवेत सहाय्यक पोलिस निरीक्षक निरज उबाळे, उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे आदी.

: ३ लाख १४ हजाराचा मुद्देमाल हस्तगत
: चौघा आरोपीना अटक

कुपवाड (प्रमोद अथणिकर) : कुपवाड मधील स्वामी मळा येथील अंकुश महादेव भंडारे रा स्वामी मळा कुपवाड याच्या चार चाकी वाहनातील अज्ञात चोरट्याने डीझेल चोरी करण्याचा प्रकार घडला होता. त्यांच्या मुसक्या आवळून पोलिसांनी डिझेल चोरीचे रॅकेट उघडकीस आणले आहे

याबाबत अधिक माहिती अशी , 6 मार्च रोजी रात्री कुपवाड परिसरातील चार चाकी वाहनातील डीझेलची चोरी छोटा हत्ती या चार चाकी वाहनातून करण्यात आली होती. या वेळी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात ही आली होती. या अनुषंगाने कुपवाड पोलिसांनी तात्काळ पोलिस पथके रवाना करून अवघ्या 24 तासात चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या असून त्याच्या कडून चार चाकी छोटा हत्ती मालवाहतूक गाडी व मुद्देमाल असा एकूण 3 लाख 14 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संशियतांवर अटकेची कारवाई करण्या आलेली आहे.

या प्रकरणी संशियत आरोपी जितेंद्र निवृत्त घोडके वय वर्षे 31 रा स्वामी मला कुपवाड ,आनंद कृष्णा मेटकरी वय वर्षे 19 रा लक्ष्मी नगर सांगली, वैभव कृष्णा मेटकरी वय वर्षे19 रा लक्ष्मी नगर सांगली व निखिल महेश मागडे वय वर्षे 21 रा हडको कॉलनी सांगली यांना पोलिसांनी अटक करून त्यांच्या वर गुन्हादाखल करण्यात आला आहे .

सहाय्यक पोलिस निरीक्षक निरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे, हवालदार युवराज पाटील, श्री. गव्हाणे, सतिश माने, शिवाजी जाधव, सचिन पाटील, नामदेव कमलाकर, इंद्रजीत चेळकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments