Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

पेठ येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी साजरी

पेठ (रियाज मुल्ला)
ग्रामपंचायत कार्यालय पेठ ता. वाळवा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी साजरी करणेत आली. यावेळी सावित्रीबाई यांच्या प्रतिमेस भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यसमिती सदस्य सम्राट महाडीक यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले

यावेळी जि. प सभापती जगन्नाथ माळी, तंटामुक्त समिती अध्यक्ष धनपाल माळी, नेते विकास दाभोळे, शहाजी चव्हाण सर, बाळासो कदम, नामदेव भांबुरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सम्राट महाडिक म्हणाले की, स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाई यांचे काम अतुलनीय आहे. त्यांच्या त्यागाची सर्वांनी आठवण ठेवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल. सभापती श्री जगन्नाथ माळी यांनी बोलताना सांगितले की, सावित्रीबाई फुले यांनी अनंत यातना सोसून स्त्री चळवळ उभी केली व त्यामुळे स्त्री शिक्षणाची कवाडे सामान्यांसाठी खुली झाली. आभार श्री विकास दाभोळे यांनी मानले.

Post a comment

0 Comments