Daily Mahasatta

Daily Mahasatta

कोरोनाची लस पूर्णपणे सुरक्षित : सरपंच श्रीमती मिनाक्षीताई महाडिक

पेठ (रियाज मुल्ला )
कोरोनाची लस पूर्णपणे सुरक्षित असून याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत, नागरिकांनी न घाबरता लसीकरण करून घ्यावे, असे मत पेठच्या लोकनियुक्त सरपंच श्रीमती मिनाक्षीताई महाडिक यांनी व्यक्त केले.

त्या पेठ ता. वाळवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित कोविड १९ विरोधक लसीकरण उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होत्या.
सरपंच मिनाक्षीताई महाडिक यांच्या शुभहस्ते लसीकरण मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.

श्रीमती महाडिक म्हणाल्या, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आपल्याकडे त्याचा स्प्रेड कमी दिसत असला तरी धोका तेवढाच वाढत आहे. नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत स्वच्छता, सुरक्षित अंतर, सॅनिटायझर व मास्कचा वापर नियमित करावा. त्यामुळे स्वतः, आपले कुटुंब आणि पर्यायाने समाज सुरक्षित राहील याची काळजी घ्यावी.

लसीकरण करून घेतल्याने आपण पूर्णपणे सुरक्षित होऊ आणि सर्व नियमांचे पालन करून कोरोनावर मात करू. यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी या लसीकरणाच्या लाभ घेऊन सुरक्षित राहावे.
याप्रसंगी जिल्हा परिषदचे बांधकाम सभापती जगन्नाथ माळी, प .स .सदस्य वसुधा दाभोळे, जि. प. सदस्या सौ संध्याताई आनंदराव पाटील, डॉ. वृषाली देवापुरे, सूर्यकांत शिंदे व पेठ प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक-सेविका व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments