Daily Mahasatta

Daily Mahasatta

मदनभाऊ पाटील युवा मंचाकडून बुधगावात ' महास्वच्छता अभियान '

सांगली (प्रतिनिधी)
राज्यभरात स्वच्छ सर्वेक्षणाचा डंका वाजत असताना सांगली जिल्ह्यातील बुधगावात मात्र अस्वचछतेमुळे कचर्याचे ढिगारे तयार झाले होते. मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला पडलेला कचरा हीच बुधगावची खास ओळख झाली होती. मात्र सांगली येथील मा. मदनभाऊ पाटील युवा मंच शाखा बुधगाव यांनी गेल्या १० वर्षापासून चा साचलेला सुमारे ३ टन कचऱ्याचा ढीग स्वच्छ केला.

याबाबत अधिक माहिती अशी, बुधगाव हे सांगली शहरालगत असलेले छोटेसे गाव आहे. कचरा हीच या गावाची अलिकडची खास ओळख. गावात प्रवेश केल्यापासून गाव संपेपर्यंत किमान सहा ते सात ठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग आणि त्याच्या भवती फिरणारी मोकाट जनावरे हे गेल्या काही वर्षापासून चे चित्र. मात्र मा. मदनभाऊ पाटील युवा मंच शाखा बुधगाव यांनी या गावात महास्वचछता मोहिम राबवून सुमारे तीन टन कचरा युवा गोळा केला आहे.

बुधगाव येथील रामकृष्ण हॉटेल समोरील कचरा स्वच्छ करून युवा मंचाकडून ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बाकडी टाकण्यात आली. या उपक्रमाचे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी कौतुक करून समाधान व्यक्त केले. तसेच मदनभाऊ पाटील युवा मंच शाखा बुधगाव च्या सर्व सर्व टीमचे अभिनंदन केले. मदनभाऊ पाटील युवा मंचाचे जिल्हा उपाध्यक्ष शेखर पाटील, बुधगाव ग्राम प्रमुख रामचंद्र कुट्टे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमास युवा मंचचे जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे यांनी भेट देऊन केलेल्या कामाचे कौतुक केले. यावेळी किशोर कुट्टे, अक्षय देसाई, लालसाहेब तांबोळी, आदित्य शेटे, आनंदा बजबळकर, योगेश कारंडे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
--------------------------------
बुधगावात स्वच्छता
कायम राहणार का?

बुधगावात स्वच्छता मोहिम राबवून मदनभाऊ पाटील युवा मंचाने मोठ्या प्रमाणात कचरा उठाव केला. मात्र इथून पुढच्या काळात स्थानिक नागरिक देखील स्वयंशिस्त पाळत स्वच्छता राखणार का ? तसेच ग्रामपंचायत नियमितपणे कचरा उचलून गावात स्वच्छतेचा पायंडा पाडणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 

Post a Comment

0 Comments