Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

सांगली जिल्ह्यात कोरोनाच्या दुसर्या लाटेची शक्यता आहे : मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी

सांगली (प्रतिनिधी)
सांगली जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काही दिवसांपूर्वी १० ते १२ प्रति दिवस असणारी रुग्ण संख्या आता चाळीसच्या वर पोहचली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना च्या दुसर्या लाटेची शक्यता आहे, अशी भिती सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी व्यक्त केली आहे

मुख्य कार्यकारी अधिकारी डुडी म्हणाले, महाराष्ट्रासह सांगली जिल्ह्यातील आसपासच्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना वाढत आहे. सांगली जिल्ह्यात देखील आता कोरोना चा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात आता दररोज ४० पेक्षा अधिक रुग्ण सापडतात. हे निश्चित चिंताजनक आहे. त्यामुळे आता नागरिकांना मास्क आणि सोशल डिस्टन्सींगच्या नियमाची अंमलबजावणी करावी. तसेच कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करुन घेण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
-----------------------------
आज जिल्ह्यात
४३ कोरोना पॉझिटीव्ह...
सांगली जिल्ह्यात आज ४३ रुग्णाचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. यामध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील १७ रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाचा आकडा जिल्ह्यातील प्रशासन आणि नागरिकांची चिंता वाढविणारा ठरत आहे.

Post a comment

0 Comments