Daily Mahasatta

Daily Mahasatta

नव महाराष्ट्र शिक्षण संस्थेत विज्ञानदिन उत्साहात साजरा

कुपवाड (प्रमोद अथणिकर) : नव महाराष्ट्र शिक्षण संस्था व अकुज चॅरिटेबल ट्रस्ट कुपवाड संस्थेअंतर्गत सौ. आशालता आण्णासो उपाध्ये गर्ल्स हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय, न्यू प्रायमरी स्कूल, अकुज इंग्लिश मिडीयम स्कूल व अकुज प्रायमरी स्कूल, कुपवाड यांचे संयुक्त विद्यमाने दि. 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन 1 मार्च रोजी शाळेच्या तारक सभागृह येथे साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमामध्ये विज्ञान प्रदर्शन, रांगोळी स्पर्धा व प्रदर्शन, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे मा. डॉ. राम लाडे, संस्थेचे अध्यक्ष आण्णासाहेब उपाध्ये, संचालक सुरज उपाध्ये, कांचन उपाध्ये यांच्या हस्ते झाले. रांगोळी प्रदर्शना मध्ये शाळेच्या विद्यार्थींनीनी शरीराच्या विविध भागांची माहिती, शास्त्रज्ञांची माहिती, पर्यावरण अशा विविध विज्ञान विषयासंदर्भात उत्कृष्ट अशा विविध प्रकारच्या रागोंळ्या काढणेत आल्या होत्या तसेच विद्यार्थ्यीनींनी विविध उपकरणे व प्रात्यक्षिके सादर केली.

त्यानंतर मुलींनी विज्ञान विषयक भाषणे सादर केली. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे मा. डॉ. राम लाडे व उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास सर्व विभागाचे विभागप्रमुख, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निर्मला वाडकर, विज्ञान विषय माहिती मंगल जाधव, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आश्विनी पाटील, आभार आशुतोष भोसले यांनी केले.


Post a Comment

0 Comments