Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

महिला सक्षमीकरणास न्याय देणारा अर्थसंकल्प : कार्याध्यक्ष उत्तमशेठ चव्हाण, अशोक कोळी

जतेत अर्थसंकल्प अभिनंदन बैठक

जत ( सोमनिंग कोळी)
राज्याचे अर्थमंत्री नाम. अजितदादा पवार यांनी महिला दिनी सादर केलेला अर्थसंकल्प महिलांच्या सक्षमीकरणास आणि त्यांना न्याय देणार आहे. या अर्थ संकल्पात शालेय विद्यार्थीनी पासुन ते घरकाम करणाऱ्या माता भगिनींचा ‍ विचार करण्यात आला आहे. त्यामुळे हा अर्थ संकल्प खऱ्या अर्थानी राज्यातील महिलांचे हित जोपासणारा असल्याचे राष्ट्रवादी कार्याध्यक्ष उत्तमशेठ चव्हाण व युवक जिल्हा उपाध्यक्ष अशोक कोळी यांनी सांगितले.

चव्हाण व कोळी म्हणाले, आजच्या अर्थसंकल्पात आमचे नेते नाम. अजितदादांनी 12 वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व मुलींना मोफत एस. टी. बसची सेवा उपलब्ध करुन दिली आहे. या निणर्यामुळे दुष्काळी, आदिवासी, पाड्यातील, गोर गरीब घरातील आमच्या भगिणींच्या घरात ज्ञानाचा प्रकाश उजळण्यास खुप मोठी मदत होणार आहे. तसेच यापुढे जिजाऊ गृहस्वामिनी योजनेअंतर्गत महिलांच्या नावावर घर खरेदी करणाऱ्यांना खरेदी दराच्या प्रचलित दरात मुद्रांक शुल्कात सुट देण्यात येणार आहे. त्यामुळे हा निर्णय अतिशय क्रांतीकारी आहे. त्याच बरोबर लॉकडाऊन काळात राज्यातील घरकाम करणाऱ्या महिलांना खुप मोठा आर्थीक फटका बसला आहे. याची गाभीर्याने नोंद ना. अजितदादा यांनी घेतली. त्यांच्यासाठी संत जनाबाई महिला सक्षमीकरणा योजनेची घोषणा करुन दादांनी न्याय दिला आहे. महिला संरक्षणासाठी पोलीस दलात फौज निर्माण करणे आदि घोषणा व त्याची तातडीने अंमलबजावणी अर्थमंत्री अजितदादांनी केली आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प राज्याच्या इतिहासात नोंद करण्यासारखा आहे.

मुलींची बस सेवा, घरकाम करणाऱ्या महिला, मजुर महिला पोलीस यांचे प्रश्न आम्ही जत तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस, युवक राष्ट्रवादी कॉग्रेस, महिला राष्ट्रवादी कॉग्रेस, अल्पसंख्याक राष्ट्रवादी कॉग्रेस यांच्या माध्यमातुन ना जयंत पाटील साहेब यांच्याकडे सातत्याने मांडली होती. याची विशेष नोंद व दखल यंदाच्या अर्थ संकल्पात घेतली आहे.

तसेच राज्यातील सिंचन क्षमतेमध्ये वाढ व्हावी यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांनी जलसंपदा विभागासाठी रु. 12,951 कोटी रुपयांची अर्थसंकल्पामध्ये तरतुद करुन घेतली आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याला म्हैशाळ विस्तारीत योजनेला 100% फायदा होऊन कामाला गती मिळेल व दुष्काळी जत तालुक्याचे नंदनवन होईल.

याबद्दल आम्ही ना. जयंत पाटील साहेब, ना. विश्वजित कदमसाहेब, ना. अजितदादा पवारसाहेब, आ विक्रमदादा सावंत, महाविकास आघाडी सरकारचे विशेष आभार मानतो, असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले. यावेळी स्वप्नील शिंदे (नगरसेवक), हेमंत खाडे, पवन कोळी, हेमंत चौगुले, संतोष देवकर, रुपेश पिसाळ, जयंत भोसले, सागर चंदनशिवे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.

Post a Comment

0 Comments