Daily Mahasatta

Daily Mahasatta

वांगीत नेहरू युवा केंद्राच्यावतीने जलदिन व " स्वच्छ, सुंदर हरित गाव " कार्यक्रम संपन्न .

कडेगाव , (सचिन मोहिते )
नेहरू युवा केंद्र सांगली अर्थात खेळ व युवा मंत्रालय भारत सरकार यांच्यातर्फे जल दिन व स्वछ सुंदर हरित गाव कार्यक्रम शासकीय निवासी शाळा -समाज कल्याण विभाग महाराष्ट्र -वांगी येथे पार पडला. सदर कार्यक्रमासाठी नेहरू युवा केंद्राच्या जिल्हा युवा समन्वयक अरुणा कोचुरे मॅडम, शाळेचे मुख्याध्यापक श्री. संतोष भोसले सर तसेच नेहरू युवा केंद्राच्या फरीदा फकीर मॅडम, सांगलीचे सर्पमित्र तसेच क्रीडा शिक्षक श्री. मयूर जाधव सर, शासकीय निवासी शाळेचे श्री. दिग्विजय झेंडे सर, श्री. पाटील आर. बी. सर, सौ. पवार मॅडम, श्री. शेखर मोहिते सर (स्पर्धा परीक्षा केंद्र अध्यक्ष) तसेच BVG व krystal कर्मचारी व संस्थेचे इतर कर्मचारी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांना वृक्ष रोपे देऊन सत्काराने करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दिग्विजय झेंडे सरांनी तसेच आभार प्रदर्शन श्री. पाटील आर. बी. सरांनी केले. नंतर शाळेच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सदर कार्यक्रमास नेहरू युवा केंद्राचे लेखाधिकारी श्री. संजय कुरणे सर तसेच श्री. सागर व्हणमाने सरांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे नियोजन कडेगाव तालुका प्रतिनिधी श्री. अनिकेत मोहिते यांनी केले होते .

Post a Comment

0 Comments