Daily Mahasatta

Daily Mahasatta

रोटरीच्या सोबतीने प्रभावी उपक्रम राबवूया :रोटरीचे सेवाभावी संस्थांना आवाहन

सांगली : रोटरी क्लब ऑफ सांगली सिटी व स्नेहजित प्रतिष्ठानच्या सेवाभावी संस्था संवाद उपक्रमातील सहभागी दिनेश कुडचे यांना प्रमाणपत्र देताना मंदार बन्ने. शेजारी प्रशांत आगवेकर, स्नेहल गौंडाजे.

सांगली (प्रतिनिधी) : रोटरीसोबत सांगलीतील स्वयंसेवी संस्थांनी संघटितपणे काम केल्यास हे काम अधिक प्रभावी होईल, असे मत रोटरी क्लब ऑफ सांगली सिटी व स्नेहजित प्रतिष्ठान यांच्यामार्फत आयोजित स्वयंसेवी संस्थांच्या ऑनलाइन बैठकीत मान्यवरांनी व्यक्त केले.

रोटरीच्या 116 व्या वर्धापन दिनानिमित्त हुतात्मा स्मारक या ठिकाणाहून ही ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात रोटरी प्रतिनिधींनी संस्थाना एकत्रित येण्याचे आवाहन केले. रोटरीचे संस्थापक पाॅल हॅरीस यांच्या प्रतिमेचे पूजन स्नेहजित प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्मती गौंडाजे यांच्या हस्ते झाले. रोटरी क्लब ऑफ सांगली सिटी चे प्रेसिडेंट मंदार बन्ने यांनी स्वागत केले.

स्नेहल गौंडाजे यांनी सांगली परिसरातील स्वयंसेवी संघटनांचे संस्थांचे संघटन करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. रोटरी बरोबर या संस्थांनी काम केल्यास त्याचा सामाजिक प्रभाव मोठ्या प्रमाणात होऊ शकेल, असे मत व्यक्त केले. रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर नितीन शहा यांनी रोटरीच्या जगभरात चाललेल्या उपक्रमांची माहिती दिली.

सायबर तज्ञ दिनेश कुडचे यांनी स्वयंसेवी संस्थांनी सायबर गुन्ह्यासंदर्भात घ्यावयाची काळजी, फेसबुक व्हाट्सअप याबाबत पाळावयाचे बंधने, संस्थांच्या वेबसाईट संदर्भातची महत्वाची माहिती दिली. इस्लामपूर येथील युवा उद्योजक सचिन खराडे यांनी एनजीओ साठी रोटरी व स्नेहजित प्रतिष्ठानच्या सूचनेनुसार बनविलेल्या सॉफ्टवेअरबाबत माहिती सांगितली. सॉफ्टवेअरच्या मदतीने एनजीओ आपली माहिती अपडेटेड ठेवू शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

नेत्ररोगतज्ञ सुहास जोशी यांनी रोटरी क्लब सांगलीच्या स्कीन बँक योजनेची माहिती दिली. तसेच नेत्रदान चळवळ मोठ्या प्रमाणात राबवली पाहिजे, असे मत व्यक्त केले. रोटरी आर्च क्लम सोसायटीचे मेंबर किशोर लुल्ला यांनी रोटरी बरोबर सामाजिक संस्थांनी काम करावे पुढाकार घ्यावा. फोकस एरियामध्ये रोटरीसोबत कार्य केल्यास ग्लोबल ग्रँटसह अन्य निधीतून मोठ्या प्रमाणात कार्य होऊ शकेल, असे स्पष्ट केले. रोटरी बरोबर या, सामाजिक विकास अधिक चांगल्या पद्धतीने करूया, असे आवाहनही श्री. लुल्ला यांनी यावेळी केले.

रोटरी क्लब ऑफ सांगली सिटीचे माजी अध्यक्ष प्रशांत माने यांनी क्लबच्या उपक्रमांची माहिती दिली. कोरोना काळात गतवर्षी केलेल्या सुमारे 20 लाख रुपयांच्या कामांचे सादरीकरण त्यांनी केले. रणधीर पटवर्धन यांनी स्वयंसेवी संस्थांसाठी सुरू असलेल्या रोटरी व स्नेहजित प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे यावेळी कौतुक केले. प्रशांत आगवेकर यांनी आभार मानले. या ऑनलाईन बैठकीसाठी प्रमोद चौगुले, स्मिता शेळके, उमेश बामणे, युवराज मगदूम, सुनिता बने, अमोल पाटील, सुधा कुलकर्णी, मीनाक्षी कोळी, नीलिमा कदम, अर्चना पाटील, डॉ. भालचंद्र साठ्ये, मयूर राऊत, दत्तात्रय लोकरे यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


अधिक वाचा :

Post a Comment

0 Comments